हा छंद जीवाला लावी पिसे - 2 (बुकमार्क्स)
My Hobby - DIY Bookmark Patterns Made by Me
'कामात बदल हीच खरी विश्रांती' हे विधान 100% खरे आहे. रोजचा दिवस कितीही बिझी असला तरी आपले छंद आपल्याला फ्रेश ठेवायचे काम करतात. एरवी मला कितीही वाटलं तरी रोजच्या रोज मला हे घेऊन बसणे शक्य नसते. 'एक ना धड भाराभर चिंध्या' करायच्या नाहीत असा मी मनात विचार करते. पण होतं काय की चिंध्या झाल्या तरी मग त्यातून आता क्विल्टिंगचा कोणता पॅटर्न करता येईल याचेच विचार डोक्यात येत राहतात.😀 नाही, पण हे खरंच आहे. टिव्ही बघताना वगैरे बहुतेक वेळा मला हातात काहीना काही घेऊन बसायला खूप म्हणजे खूप आवडतं. एकदम me time मिळाल्यासारखं वाटतं. असेच फावल्या वेळात केलेले उद्योग खाली फोटोंच्या स्वरूपात शेअर केले आहेत.
ह्या सगळ्या बुकमार्क्सचे डिझाइन्स आणि पॅटर्नस् माझे स्वत:चे आहेत. भौमितीय आकार किंवा Geomatrical Patterns मला विशेष आवडतात. त्याची 2 - 3 कारणं आहेत. एकतर टिव्ही बघताना वगैरे एकीकडे केल्यास समोर मोजून करायला दुसरा पॅटर्न नसला तरी चालतो. खूप किचकट डिझाइन्स नसल्यामुळे भराभर काम होतं. डोळे फोडून काही करण्याची गरज नसते. शिवाय मला वैयक्तिक सांगायचे झाल्यास जागा मोकळी न राहता भरगच्च पॅटर्नस् आवडतात. हे मी केलेले बुकमार्क्स तुम्हाला कसे वाटले? आवडले का ते मला कमेंट करून नक्की सांगा.
















Very creative
ReplyDeleteThank You!
Delete