झणझणीत आणि चमचमीत रावण पिठलं रेसिपी
Extra Hot and Spicy Ravan Pithla Recipe in Marathi - Spicy Gram Flour(Besan) Curry Made With Extra Oil and Hot Peprika
बेसनाचा आणखी एक चमचमीत पदार्थ -
साहित्य -
1 वाटी बेसन पीठ
1 वाटी तेल
1/2 वाटी लाल तिखट
1/2 वाटी सुके खोबरे किंवा डेसिकेटेड कोकोनट
1 वाटी कोथिंबीर
2 लसूण पाकळ्या
फोडणीसाठी - मोहरी, हिंग, हळद
चवीनुसार मीठ
कृती -
कढईत वाटीभर तेल गरम करा.
तेल तापलं की मोहरी आणि हिंग घालून फोडणी करा.
आता या फोडणीत डाळीचं पीठ, तिखट आणि सुकं खोबरं घाला.
तेलात बेसनपीठ 5 मिनिटे व्यवस्थित परतून घ्या.
आता ह्यात 3 - 4 वाट्या पाणी आणि मीठ घाला.
पिठलं शिजल्याची खूण म्हणजे उकळताना पिठलं कढईच्या बाहेर उडायला लागलं की शिजलं असं समजायच.पिठलं शिजलं की गॅस बंद करा.
वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
भाकरी किंवा भाताबरोबर पिठल्याचा आस्वाद घ्या.
हे पिठलं खाताना हाताशी भरपूर दही, ताक, लोणी, तूप असं घेऊन ठेवा.
माझ्याकडे असलेलं तिखट खूप जास्त स्ट्राँग होतं.
कदाचित सौम्य चवीचं किंवा काश्मिरी तिखट वापरलं तर पिठलं जास्त तिखट लागणार नाही.
पिठल्यात खोबरं घातल्याने तिखटपणा थोडा बॅलन्स व्हायला मदत होते.
पण सुक्या खोबर्याएवजी ओला नारळ घालू नका.
खोबरं घातलच नाही तरी चालेल.
मी लसूण फोडणीत घालायला विसरले.
त्यामुळे बेसन, तिखट आणि सुकं खोबरं घातल्यानंतर मी त्यात लसूण घातला.
म्हणून तो फोटो नाहीये.
Hot and Spicy Ravan Pithla(Besan) Recipe in English
1 cup gram flour
1 cup oil
1/2 cup red chili powder
1/2 cup dried coconut or desiccated coconut
1 cup cilantro (coriander)
2 garlic cloves
For Tempering - mustard, asafoetida, turmeric
Salt to taste
Directions -
Heat a cup of oil in a pan.
Heat oil, add mustard seeds and asafoetida.
Add garlic to the pan and fry till golden.
Now add besan, red chilli powder and dried coconut.
Mix all this and add turmeric.
Saute besan in oil for 5 minutes.
Now add 3-4 cups of water and salt.
Mix altogether and let it simmer on low heat.
The sign that the Besan is cooked when you see the Pithla starts boiling vigorously and splits out of the pan in the form of small spots.
When the Ravan Pithla is cooked, turn off the heat.
Add a lot of finely chopped cilantro on top.
Ravan Pithla tastes awesome with Bhakri(Jowar roti/Sorgum Millets Bread) or rice.








Comments
Post a Comment